…तर आर्यन खानची दिवाळीही तुरुंगातच!

…तर आर्यन खानची दिवाळीही तुरुंगातच!

Published by :
Published on

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. यामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अनेक रात्री तुरुंगात काढाव्या लागत आहे. दरम्यान आर्यन खानच्या जामिनावर आज (२८ ऑक्टोबर) दुपारी सुनावणी केली जाणार आहे. मात्र जर आज (२८ ऑक्टोबर) आणि उद्या (२९ ऑक्टोबर) ही सुनावणी आर्यनच्या जामिनावर योग्य निर्णय झाला नाही, तर मात्र त्याला दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागणार आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर आज (२८ ऑक्टोबर) होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली तर पुढील १५ दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी कोर्टाकडून वारंवार तारखा दिल्या जात आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना कालची रात्रही तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अरबाज मर्चंटसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला.

ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, या युक्तीवादाला अधिक वेळ लागल्यानं न्यायालयानं जामिनावर उद्या पुन्हा सुनावणीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी आज दुपारी दीड वाजता सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com