Goa Assembly Election 2022 | भाजपकडून पत्ता कट; उत्पल पर्रिकरांना केजरीवालांनी दिली खुली ऑफर
गोव्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष उमेदवारांच्या नावे जाहीर करत आहे. आज भाजपाने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत उत्पल पर्रिकरांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यात आता आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना गोवा निवडणूक (Goa Election) लढवण्यासाठी आपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. उत्पल पर्रिकर ही ऑफर स्विकारतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका चॅनलचा व्हिडीओ टविट केला आहे. या व्हिडीओत असे म्हटले आहे की, उत्पल यांचा पक्ष त्यांना त्यांच्या वडिलांचा मतदारसंघ असलेल्या पणजीतून निवडणूक लढवायला परवानगी देत नाही. यावर केजरीवाल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भाजपचे पर्रिकर परिवाराबाबत 'यूज एंड थ्रो' धोरण आहे. मी नेहमी मनोहर पर्रिकर यांचा सन्मान केला. त्यामुळे AAP च्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल यांचे स्वागत आहे.' मनोहर पर्रिकर यांचे 2019 मध्ये निधन झाले. त्यानंतर गोव्याचे राजकारण बदलले आहे. विशेष म्हणजे भाजपने पणजी येथून वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले आहे. त्यांच्यावर 2016 मध्ये एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
भाजपमधून मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगतानाच अन्य पर्यायांना अर्थच नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यात आता उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना गोवा निवडणूक (Goa Election) लढवण्यासाठी आपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. उत्पल पर्रिकर ही ऑफर स्विकारतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.