Corona in Delhi: “दिल्लीत कोरोनाच्या चौथ्या लाटेनंतरही अद्याप लॉकडाऊन नाही”
राजधानीत वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, अद्याप कोणताही लॉकडाऊचा निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात कोरोनाची दुसरी लाट असू शकते. मात्र, दिल्लीत चौथी लाट आहे. सध्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरीही घाबरून जाण्याची गरज नाही, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. सरकार सर्व परिस्थितीवर नजर ठेऊन आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही पावले उचलली पाहिजेत, ती उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. परंतु यावेळी पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत. मृत्यू कमी होत आहेत आणि आयसीयूमध्येही रुग्णांना कमी दाखल केले जाते. आज जवळपास 50 टक्के रुग्ण रुग्णालयात जात आहेत.
होम आयसोलेशनमध्ये लोक चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नाही. भविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.