युक्रेनची राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळी झाडण्यात आली आहे
युक्रेनची राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळी झाडण्यात आली आहे

Russia-Ukraine War | कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, तातडीने उपचार सुरु

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War ) सुरू असलेल्या संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याचा ( Indian student) मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतरच, युक्रेनची राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळी झाडण्यात आली आहे. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे (Ministry of Civil Aviation) राज्यमंत्री (एमओएस) जनरल व्हीके सिंग (General VK Singh) यांनी गुरुवारी पोलंडमधील रझेझो विमानतळावर ही माहिती दिली.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन भारतीय हवाई दलाची दोन C-17 विमाने बुखारेस्ट (रोमानिया) आणि बुडापेस्ट (हंगेरी) येथून दिल्लीजवळील हिंडन विमानतळावर दाखल झाले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर आम्ही मागील तीन दिवसात सात विमानं भारतात पाठवले. 200 विद्यार्थ्यी मायभूमीत आणल्या गेले, अशी माहिती व्ही.के. सिंह यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com