Shweta Shigvan-Kavankar
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज लावले जात आहेत.
याचे मुख्य कारण म्हणजे इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेली स्टोरी ठरत आहे.
धनश्रीने लग्नानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर बदल करत चहल आडनाव जोडलं होते. परंतु, आता तिने पुन्हा चहल आडनाव काढून धनश्री वर्मा असे केले आहे.
तर, युजवेंद्र चहलनेही नवीन आयुष्याची सुरूवात अशी पोस्ट काही वेळातच डिलीट केली. यामुळे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
यावर युजवेंद्र चहलने चर्चांना पूर्णविराम देण्याची विनंती केली आहे.
माझ्या नात्यासंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. चर्चांना पूर्णविराम द्या. सर्वांना प्रेम, असे चहलने सोशल मीडियावर म्हंटले आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री २०२० मध्ये विवाहबंधनात अडकले.
धनश्री वर्मा युट्यूबर आणि कोरिओग्राफर असून सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.