Shweta Shigvan-Kavankar
सोशल मीडियावर विविध कारणांमुळे केतकी चितळेची नेहमीच चर्चेत असते.
मागील काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेविरोधात 22 एफआयआर दाखल झाल्या होत्या.
यामुळे तिला तब्बल 41 दिवस जेलमध्ये राहावे लागले होते. सध्या ती जामिनावर सुटली आहे,
यानंतर केतकी चितळे सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टीव्ह झाली आहे.
मध्यंतरी केतकीने तिच्या 'गुप्त' नावाची शॉर्ट फिल्मबाबत एक पोस्ट शेअर केली होती.
यानंतर केतकीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
सध्या ती छोट्या पडद्यापासून दुर आहे. परंतु, केतकी बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा होत्या.
मात्र, केतकीने या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. बिग बॉससारख्या दयनीय मानवी प्रयोगात भाग घेणे माझा दर्जा कमी करण्यासारखं आहे. आणि मी पैशासाठी माझा दर्जा कधीच कमी करणार नाही, असं केतकीने म्हंटले होते.
सध्या केतकी एपिलेप्सीबाबत जनजागृती करत आहेत.