नीळे केस, लाल साडी! अभिनेत्याचे अनोखे फोटोशूट, उर्फीने केले कौतुक

Shweta Shigvan-Kavankar

विजय वर्माच्या खास स्टाइलने बॉलिवूड अभिनेता विजय वर्माने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्याने क्लासिक मेटल साडी परिधान करून फोटोशूट केले. त्याने आपले केसही निळ्या रंगात रंगवले आहेत.

विजयने रिमझिम दादू या ब्रँडसाठी नवीन फोटोशूट केले आहे.

यामध्ये तिने ब्रँडची काळी आणि लाल क्लासिक मेटल साडी आणि काळा शर्ट परिधान केला आहे.

विजय वर्माच्या साडीतील लुकचे अनेक जण कौतुक करत आहे. तर काहींनी ट्रोल केले आहे.

उर्फी जावेदने त्याला 'जादू' म्हटले आहे. अनेक युजर्सनी विजयचे कौतुक केले.

एका युजर्सने म्हंटले की, विजयला पाहून असे वाटते की तो एनिमे मध्ये ऑडिशन देणार आहे. अनेकांनी त्याला छपरी असेही म्हंटले आहे.

तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, बघा आंटी, तुमचा मुलगा आता छपरी झाला आहे. केस निळे रंगवले.

आणखी एका यूजरने लिहिले की, भाऊ उजाला केसांनी नव्हे तर इंडिगोने कपडे स्वच्छ करते. दुसऱ्या युजरने लिहिले, भाऊ, तुम्ही या लाईनमध्ये आलात का?

रणवीर सिंगच्या 'गली बॉय' या चित्रपटातून विजय वर्माला ओळख मिळाली होती.