Vikrant Shinde
Nazz चं खरं नाव हे निहार होडवडेकर आहे.
Nazz मुंबईमधील विरारमध्ये त्यांच्या काकीसोबत राहतो.
Nazz त्याच्या गाण्यांमधून स्वत:च्या आयुष्याबद्दल व्यक्त होत असतो.
त्याचे वडील हे सध्या हयात नसून तो, लहानपणीच आई-वडिलांपासून पोरका झालाय. त्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या काका-काकींनी केला. सध्या त्याचे काकाही हयात नाहीत.
Nazz रॅप करण्याआधी बॉलिवूडमधील गाण्यांचे कव्हर साँग्स बनवायचा.
त्याने स्वत:ची गाणी रेकॉर्ड करण्यासाठी घरातीलच वस्तू चोरून विकल्याची कबूली त्याच्या गाण्यातच दिली आहे.
त्याने ऑरफन (Orphan) या त्याच्या गाण्यामध्ये स्वत:च्या आयुष्यातील सर्व कठीण परिस्थितींबद्दल भाष्य केलं आहे. या गाण्यावर रफ्तार या नामांकित रॅपरने 'Hum sabko Tumpe Nazz hai' अर्थाथ 'आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे' अशी कमेंटही केली आहे.
त्याने रॅपमधील करीअरच्या सुरूवातीच्या काळात MC Stan या रॅपरला Diss केलं होतं. मात्र, हे त्या रॅपबद्दल फार माहिती नसल्यामुळे केल्याची कबुली एका मुलाखतीमध्ये दिली.
मुनावर फारुकी हा सुप्रसिद्ध कॉमेडियन तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने मनातील खदखद व्यक्त करणारं व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं 'आझमाईश' नावाचं गाणं रीलीज केलं होतं. त्या गाण्यामध्ये Nazz फीचरींग आर्टीस्ट आहे.