Team Lokshahi
अनेकांना झोपायला खूप आवडतं. अशावेळी कुणी झोपण्याची स्पर्धा आयोजित केली आहे असे तुम्हाला समजले असा या गोष्टीवर तुम्हचा विश्वास बसू शकतो का?
पण अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेमध्ये त्रिपर्णा चक्रवर्ती (Triparna Chakraborty) ही भारताची पहिली स्लीप चॅम्पियन ठरली आहे.
ही स्पर्धा जिंकल्यावर त्रिपर्णा चक्रवर्ती हिला तब्बल 5 लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय.
सर्वोत्कृष्ट झोप घेणाऱ्या व्यक्तीचा किताब त्रिपर्णा चक्रवर्तीने तिच्या नावे केला आहे.
तब्बल साडे चार लाख स्पर्धकांना मागे टाकत हा किताब पटकावला आहे.
या स्पर्धेत एकूण साडे चार लाख स्पर्धकांनी अर्ज भरला होता. आणि या स्पर्धेत १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली.
या 15 स्पर्धकांमधून अंतिम फेरीत ४ जणांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला एक मॅट्रेस आणि स्लीप ट्रॅकर देण्यात आलं होते.
सलग १०० दिवस ९ तास झोपून त्रिपर्णाने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्रिपर्णाने स्पर्धा जिंकल्याबद्दल तिला सहा धनादेश देण्यात आले आहेत.
त्रिपर्णाला लहानपणापासूनच झोपायला खूप आवडायचे. कधी बोर्डाची परीक्षा असो वा तर कधी नोकरीसंबंधित मुलाखत असो ती तेव्हाही झोपून जायची. झोपण्याच्या स्पर्धेबद्दल त्रिपर्णाला सोशल मीडियावर माहिती मिळाली होती.