Team Lokshahi
हासन यांचे नाव सुरुवातीला पार्थसारथी असे होते, त्यांच्या वडिलांनी नंतर त्यांचे नाव बदलून 'कमल हासन' असे ठेवले.
त्यांनी 'कमाल हासन' या नावाने चित्रपतश्रुष्टीत पदार्पण केले. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
कमाल हासन हे भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, पार्श्वगायक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि राजकारणी आहेत. त्यांनी मुख्यत्वे तमिळ चित्रपटात काम केले, त्याचप्रमाणे तेलुगू, मल्याळम, हिंदी, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांनी 230 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे
वयाच्या 6 व्या वर्षी कमाल हासन यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी राष्ट्रपती सुवर्णपदक आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले .
कमल हासन यांनी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 20 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले, 2000 मध्ये हे रामसाठी शेवटचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर, त्यांनी फिल्मफेअर असोसिएशनला पत्र लिहून त्यांना पुरस्कार देऊ नये आणि तरुण प्रतिभांना पुरस्कार देण्याची विनंती केली आणि त्यांनी ते स्वीकारले. त्यांना 1984 मध्ये कलईमामणी पुरस्काराने, 1990 मध्ये पद्मश्री, 2014 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये Ordre des Arts et des Lettres(Chevalier) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते भारतातील एकमेव अभिनेते आहेत ज्यांचे सात चित्रपट Academy Awards साठी सादर केले होते, त्यांना 2013 मध्ये 15 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 116 हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल या त्यांच्या निर्मिती संस्थेने त्यांच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
2019 मध्ये 'कमल हासन' यांना चित्रपटसृष्टीत 60 वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतातील काही अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळख प्राप्त झाली.
'हृदयरागम' 2010 कार्यक्रमासाठी ते प्रकल्प दूत होते, त्यांनी HIV/AIDS-ग्रस्त मुलांसाठी, अनाथाश्रमासाठी निधी उभारला . सप्टेंबर 2010 मध्ये, त्यांनी मुलांचा कर्करोग मदत निधी सुरू केला आणि पोरूर, चेन्नई येथील श्री रामचंद्र विद्यापीठात कर्करोग असलेल्या मुलांना गुलाब दिले. हासन यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी नामांकित केले होते.
कमाल हासन यांना 'श्रुती हासन', 'अक्षरा हासन' अश्या 2 कन्या आहेत, त्यांच्या दोन्ही कन्या बॉलीवूड क्षेत्रात अभिनेत्री आहेत.