श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेला 'या' पाच गोष्टी हव्यातच

Siddhi Naringrekar

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते,

उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे.

गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात.

श्रीकृष्ण जन्माष्टमीची विधिपूर्वक पूजा केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. या पूजेसाठी या पाच गोष्टी असणं आवश्यक मानलं जातं. त्या पाच गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात...

दही, दूध, लोणी या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वात आवडत्या गोष्टी. बाळ गोपालास पंचामृताचा भोग लावला जातो. प्रसाद म्हणून पंचामृतात मेवा, दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध मिसळलं जातं.

यात महत्वाचं आहे लोणी. भगवान श्रीकृष्णाला सर्वात आवडतं होतं लोणी. बाळ कृष्णाच्या अनेक लीलांमध्ये याचा उल्लेख आढळतो.

शास्त्रांमधील उल्लेखानुसार कृष्णाला बासूरी खूप प्रिय होती. म्हणून पूजेवेळी बासूरी ठेवली जाते.

जन्माष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पूजा देखील केली जाते. श्रीकृष्णाला तुळस अतिप्रिय होती, त्यामुळं पूजेत तुळशीचं महत्व अधिक आहे.

भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटामध्ये नेहमी मोरपंख ठेवायचे. त्यामुळं या पूजेत मोरपंखाचे महत्व आहे. मोरपंख ठेवणं शुभ मानलं जातं.