बॉलिवूडमधील हे कलाकार अजिबात खात नाहीत मांसाहारी पदार्थ, कारण....

Rajshree Shilare

२०२०मध्ये पेटा (PETA) या संस्थेने सगळ्यात हॉटेस्ट शाकाहारी सेलिब्रिटी किताब अभिनेत्री श्रद्धा कपूरला (Shraddha kapoor) दिला. मांसाहारी पदार्थ खाण्याबाबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट देखील शेअर केली होती.

पेटा (PETA) कुकबूकपासून प्रेरित होऊन श्रद्धा कपूरने हा निर्णय घेतला होता. अजूनही ती शाकाहारीच आहे.

Shraddha Kapoor

अभिनेता शाहिद कपूर (Shahid kapoor) सुद्धा शाकाहारी आहे. वडिल पंकज कपूर यांनी त्याला गिफ्ट केलेलं ‘ब्रायन हाइन्स, 'लाइफ इज फेअर’ हे पुस्तक वाचून त्याने मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केलं.

पेटा (PETA) या संस्थेचा ‘पर्सन ऑफ द इयर’ हा किताब आर माधवनच्या नावे आहे. कत्तलखान्यामध्ये काय चालतं हे जर तुम्ही पाहिलात तर तुमची देखील मांस खाण्याची भूक कमी होईल असे आर माधवनचं (R. Madhavan) म्हणणं आहे.

R. Madhavan

आमिर खानची(Aamir khan) एक्स पत्नी किरण राव हिने त्याला एक व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडलं. दुग्धपदार्थांचे सेवनही त्याने टाळलं आहे.

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना देखील पेटा (PETA) या संस्थेने हॉटेस्ट शाकाहारी सेलिब्रिटीचा किताब दिला. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरावे म्हणून अमिताभ यांनी मद्यपान, धूम्रपान, मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केलं.

Amitabh Bachchan

कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घरी मांसाहारी पदार्थ तयार केले जायचे. मात्र अध्यात्मिकदृष्ट्या हे पदार्थ खाणं तिच्या मनाला पटत नसल्याने तिने मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं पूर्णपणे बंद केलं.

Kangana ranaut

अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) लॉकडाऊनच्या काळात मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. पण याआधी ती मांसाहारी पदार्थांचे सेवन करत होती.

Bhumi Pednekar

काही वर्षांपासून रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. या दोघांनी ‘इमॅजिन मीट्स’ नावाची कंपनीही सुरु केली. वनस्पती आधारित मांसाचे सेव रितेश-जेनेलिया करतात.

Riteish Deshmukh