Shweta Shigvan-Kavankar
बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतला सर्वच जण ओळखतातय
राखीने हिंदी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट आणि गाणी केली आहेत.
राखी सावंतने 'बिग बॉस'च्या घरात अनेकदा प्रवेश केला आहे. ती चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.
राखी सावंतचे वडील कॉन्स्टेबल होते, पण त्यांचा पगार खूपच कमी होता. यामुळे अनेकदा शेजारच्या घरातून त्यांना जेवण मिळायचे.
आर्थिक अडचणींमुळे राखी वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी वेटर बनली. राखीने टीना अंबानीच्या लग्नात 50 रुपये रोजंदारीवर वाढपीचे काम केले.
राखीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने लग्न करावे अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. लहानपणी ती नृत्याची प्रॅक्टिस करायची तेव्हा तिला मार पडायचा.
परिस्थितीला कंटाळून काही पैसे घेऊन घरातून पळून गेल्याचे राखी सावंतने सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे नाते संपवले होते.
राखी सावंत म्हणते की तिला कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे तिला रिजेक्ट करण्यात आले. नंतर अभिनेत्रीने तिच्या नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली.
राखी सावंत आज करोडोंच्या संपत्तीची मालक आहे. त्यांचा मुंबईत एक आलिशान बंगलाही आहे.
राखी सावंतने नुकतेच आदिल खानसोबतच्या लग्नाचा खुलासा करताना तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.