सनी लिओनीचा साडी लूक व्हायरल; चाहते पडले प्रेमात

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड लूकमध्ये दिसत असते.

परंतु, सनीचा नुकताच नवीन लूक समोर आला असून हे पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

सनी लिओनीचा लवकरच ‘ओह माय घोस्ट’ हा तमिळ चित्रपट रिलीज होणार असून त्याच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमासाठी तिने साडीत हजेरी लावली होती.

यावेळी तिने गुलाबी बॉर्डर असलेली हिरव्या रंगाची कांजीवरम साडी आणि ज्वेलरी म्हणून झुमके घातले होते.

हिरव्या साडीत सनीचे सौदर्यं अधिकच खुलून दिसत असल्याने सर्वांनाच तिची भूरळ पडली होती.

तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सनीला साडीत पाहून चाहते तिच्या अधिकच प्रेमात पडले आहेत.

सनी 'ओह माय घोस्ट' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'बिग बॉस तमिळ 6' स्टार जीपी मुथू याच्यासोबत हॉरर-कॉमेडी चित्रपटात पदार्पण करत आहे.