Team Lokshahi
अभिनयाने युवापिढीच्या मनावर राज्य करणाऱ्या सुबोध भावेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुबोध भावेने 'कळत नकळत' या झी मरीठीवरच्या मालिकेतून छोटेया पड्दयावर पदार्पण केल. त्याआधी त्याने अनेक वेगवेगळ्या नाटकात काम केले होते.
सुबोधने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांचे बॅायोपिक केले असून त्या प्रत्येक भुमिकेवर त्याने त्याच्या अभिन्याची छाप सोडली आहे.
आणि .. डॉ. काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली या मधील कामासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने साकारलेल्या काशिनाथ घाणेकरांच्या पात्रानंतर तरुण पिढीमध्ये काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल कुतूहल निर्माण झालं.
'अश्रुंची झाली फुले' या अजरामर नाटकात डॅा काशिनाथ घाणेकरांनी साकारलेलं 'लाल्या' हे त्यांच गाजलेल पात्र सुबोधने पुन्हा जिवंत केल. नंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर या नाटकाची परदेशवारी सुद्धा करण्यात आली .
'तुला पाहते रे' ही सुबोध भावेची मोठ्या प्रमाणावर पाहिली जाणारी मालिका होती. त्यात त्याने साकारलेल्या विक्रांत सरंजामेची भुमिका बरीच लोकप्रिय झाली होती.
नंतर सुबोधने 'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका केली आणि आता तो झी मरीठीवरती 'बस बाई बस' या महिलांसाठी विषेश असलेल्या मालिकेच सुत्रसांचालन करत आहे.
सुबोधचा नुकताच 'हर रह माहादेव' हा 'शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित आला आहे.