Shweta Shigvan-Kavankar
विठू माऊलीच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान झाले आहे.
संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून तर तुकारामांची पालखी देहू येथून निघाली.
पालखीच्या प्रस्थानापूर्वी आळंदीत पाना-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
प्रस्थानानेळी हजारो वारकरी देहूनगरी व आळंदीत दाखल झाले होते.
टाळ- मृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हावून निघाले होते.
पालखी मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.
२९ जून रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर लाखो वारकऱ्यांनी दुमदुमणार आहे.