shweta walge
समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही तमिळमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या करिअरमध्येही खूप यशस्वी आहे. समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नईमध्ये झाला. समांथा फक्त साउथ मध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिध्द आहे.
समांथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास सोपा नव्हता. समांथाला फिल्मी दुनियेत येण्याची आवड होती, पण घरच्या परिस्थितीमुळे तिने साऊथ इंडस्ट्रीत (South Industry) पाऊल ठेवले.
समांथा प्रसिध्द अभिनेत्रीपैकी एक आहे. समांथाची पहिली कमाई फक्त 500 रुपये होती. वास्तविक, समांथा प्रभू यांना आठ तासांसाठी होस्टेस बनण्यासाठी 500 रुपये देण्यात आले होते. त्यावेळी ती दहावी किंवा अकरावीत होती.
जेव्हा समांथा 20 वर्षांची होती, तेव्हा तिने आर्थिक अडचणींमुळे पार्ट टाइम जॉब करण्यास सुरुवात केली. यानंतर तिने आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मॉडेलिंग सुरू केले आणि तिथे तिला रवि वर्मनने (Ravi Varman) स्पॉट केले. रवि वर्मननेच समांथाला फिल्मी जगताची ओळख करून दिली.
समांथाने गौतम मेनन निर्देशित 'ये माया चेसाव' चित्रपटाने डेब्यू केली होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिला त्या वर्षी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तेव्हापासून समंथाला मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
2013 मध्ये, तिला तेलगू आणि तमिळ या दोन्ही भाषांमधील चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर मिळाला. समांथाने आतापर्यंत तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
2012 मध्ये सामंथाला रोगप्रतिकारक शक्ती विकाराने ग्रासले होते, ज्यामुळे तिच्या हातून अनेक प्रकल्पही गेले होते. त्यानंतर तिने ब्रेक घेतला आणि तिच्या तब्येतीची काळजी घेतली, त्यानंतर दोन महिन्यांनी कामावर परतली.
समांथा आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झाले आणि दोघांनी 2021 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. आता दोघांचा घटस्फोट झाला आहे.
त्याचबरोबर तिने 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटावा या गाण्याने तिची ग्लॅमरस शैली दाखवली, जी लोकांना खूप आवडली.