Rubina Dilaik Photoshoot: रुबिनाचा ग्लॅमरस अवतार

shweta walge

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलेक (Rubina Dilaik) सध्या 'खतरों के खिलाडी 12' साठी केपटाऊनमध्ये आहे. अभिनेत्री तिथेच राहून 'खतरों के खिलाडी 12' चे शूटिंग करत आहे.

रुबिना दिलीकने आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अलीकडे, तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रुबिना दिलीक सुंदर दिसत होती.

रुबिना दिलीक ब्लॅक आउटफिटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. या आउटफिटमधली रुबिना दिलीकची बोल्ड स्टाइल (Bold style) पाहून चाहते घायाळ होत आहेत.

फोटोशूटदरम्यान रुबिना दिलीकचे एक्सप्रेशन्सही देखण्याजोगे होते.

रुबिना दिलीकचे हे फोटो पाहून काही चाहत्यांनी तिला 'सुंदर' तर काहींनी तिला 'गॉर्जियस' म्हटले.