Rajshree Shilare
अभिनेत्री करीना कपूर खानची (Kareena Kapoor khan) सासू शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या एकेकाळच्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. करीना नेहमीच आपल्या सासूचं कौतुक करताना दिसते.
एका मुलाखतीत करिनानं सांगितलं होतं की, लग्नानंतर तसेच मुलांचा जन्म झाल्यानंतरही ती बॉलिवूडमध्ये काम करण्यामागे तिच्या सासू शर्मिला टागोर यांचं मोठं योगदान आहे. त्या नेहमीच तिला पाठिंबा आणि प्रेरणा देतात.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh )आई अंजू भवनानी( Anju Bhavnani) यांच्यातही नेहमीच एक खास बॉन्डिंग पाहायला मिळतं.
दीपिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिची सासू अगदी तिच्या आईसारखीच तिची काळजी घेते आणि आईची उणीव भासू देत नाही.
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam kapoor) लवकरच आई होणार आहे. अलिकडेच सोनमनं तिच्या सासू प्रिया अहुजा (Priya Ahuja) यांच्यासाठी खास नोट शेअर केली होती.
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिनं त्यांचं कौतुक केलं होतं. ज्यावरून सोनम आणि प्रिया अहुजा यांच्यात खूपच प्रेमळ नातं असल्याचं लक्षात येतं.
प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) निक जोनसशी (Nick Jonas) २०१८ मध्ये लग्न केलं होतं. निकची आई डेनिस मिलर जोनस (Dennis Miller Jonas) यांच्याशी प्रियांकाचं खूप चांगलं नातं आहे.
प्रियांका चोप्रा अनेकदा सोशल मीडियावर आपल्या सासूबाईंसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसते.
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwariya Rai Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) ही बॉलिवूडची सर्वात चर्चेत राहणारी सासू- सूनेची जोडी आहे. या दोघींमधील बॉन्डिंग तर नेहमीच सर्वांना पाहायला मिळतं.
जया बच्चन यांनी बऱ्याचदा मुलाखतींमध्ये ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. त्यांचं ऐश्वर्यावर असलेलं प्रेम नेहमीच दिसून येतं आणि ऐश्वर्या देखील आपल्या सासूची काळजी घेताना दिसते.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कपूर कुटुंबीयांची सून झाली. पण त्या आधीपासूनच आलिया आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्यात खास बॉन्डिंग आहे.
पती रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर आलियानं कपूर कुटुंबीयांना खूप आधार दिला होता. लग्नाच्या वेळी नीतू कपूर आलियाचं तोंडभर कौतुक करताना दिसत होत्या.