shamal ghanekar
दक्षिण चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ही तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावले. अलीकडेच रश्मिकाला 'पुष्पा: द राइज'चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनसोबत पाहिले होते.
रश्मिकाने तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत आणि ते कमी वेळा प्रचंड व्हायरल होताना दिसत असतात. रश्मिका तिच्या फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते.
तिने शेअर केलेले फोटोवर चाहत्यांचे भरपूर लाईक्स आणि कमेंट्स (Comment) पाहायला मिळत आहेत.
रश्मिका आता रणबीर कपूरसोबत दिग्दर्शक संदीप रेड्डी यांच्या 'अॅनिमल' (Animal) चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
रश्मिकाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम आकांऊटवरून काही फोटो शेअर केले असून ती या फोटोमध्ये पारंपारिक पोशाखात दिसत आहे.
या फोटोंमध्ये रश्मिकाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस डीप नेक ब्लाऊज परिधान केला आहे.
तसेच रश्मिकाने स्मोकी आय आणि न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत.
रश्मिकाचा हा पारंपारिक लूकची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.