shweta walge
जबरदस्त रॅपिंग आणि आपल्या अप्रतिम स्टाईलने चाहत्यांमध्ये खास ओळख निर्माण करणारा रॅपर रफ्तार सिंग (Raftar Singh) आता त्याची पत्नी कोमल वोहरा (Komal Vohra) हिला घटस्फोट (Divorce) देणार आहे.
लग्नाच्या 6 वर्षानंतर त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
रॅपर रफ्तारने (Rapper Raftaar)) 2016 मध्ये कोमल वोहरासोबत लग्न केले.
दोघेही आता आपलं नातं संपवणार आहेत. 2020 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, पण कोरोनामुळे दोघांचा घटस्फोट होऊ शकला नाही.
रफ्तार आणि कोमलच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 5 वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी 2016 मध्ये लग्न केले. कोमल ही टीव्ही कलाकार करण आणि कुणाल वोहरा (Kunal Vohra) यांची बहीण आहे.