बॉलीवूडच्या 'या' भाऊ-बहिणीच्या जोडीला तुम्ही क्वचितच ओळखता

Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे जगभरात चाहते आहेत. परंतु, तिलाही एक मोठा भाऊ आहे हे क्वचितच तिच्या चाहत्यांना माहित असेल. ऐश्वर्याच्या भावाचे नाव आदित्य राय असून तो मर्चंट नेव्हीमध्ये आहे. तो स्वतः लाइमलाइटपासून दूर राहतो.

बॉलीवूडच्या बादशाह शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहते. पण, तरीही त्याची बहीण शहनाज या चकाकीपासून दूर राहते.

अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही एक भाऊ असून त्याचे नाव सिद्धार्थ चोप्रा आहे. तो तिच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. सिद्धार्थ हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

रणवीर सिंगच्या बहिणीचे नाव रितिका भवनानी आहे. ती प्राणीप्रेमी आहे. रणवीरचे त्याच्या बहिणीशी खास नाते आहे. तो आपल्या बहिणीला धाकटी आई म्हणतो.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि त्याची बहिण अलका कुमार यांचे खास बॉन्डिंग आहे. अलका बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून दूर राहते. अलीकडेच तिने अक्षय कुमारसाठी एक खास संदेश पाठवला होता, जो ऐकून अक्षय कुमार रडला होता. अक्षयचा नुकताच रक्षाबंधन चित्रपट रिलीज झाला आहे.

अनुष्का शर्माच्या भावाचे नाव कर्णेश शर्मा आहे. विराट कोहलीप्रमाणे कर्णेशही क्रिकेटची आवड असून तो अंडर-19 रणजी क्रिकेट खेळला आहे. कर्णेश आणि विराट चांगले मित्र असल्याचे बोलले जाते. कर्णेश यापूर्वी मर्चंट नेव्हीत होता. पण आता तो क्लीन स्लेट फिल्म्स नावाची कंपनी चालवत आहे.

अर्जुन कपूरचा बहिण अंशुला कपूरही लाईमलाईटपासून दूर राहते. त्यांच्यात खास बॉण्डींग आहे.

रणबीर कपूरचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांशी जवळून संबंधित असूनही त्याची बहीण रिद्धिमा या प्रसिद्धीपासून दूर आहे. रिद्धिमा साहनी ही ज्वेलरी डिझायनर आहे.