Raj Thackeray Grandson : राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव 'किआन',पाहा पहिली झलक

shweta walge

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज शिवतीर्थावर पार पडला.

राज ठाकरे यांच्या नातवाचा नावं 'किआन' (kian) असं ठेवण्यात आले.

5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.

काही दिवसांपूर्वीच अमित यांनी आपल्या बाळाचा ब्लॅक अॅड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

अमित ठाकरे मिताली 27 जानेवारी 2019 रोजी विवाहबंधनात अडकले.

कियान या नावाचा अर्थ देवाची कृपा असं असून हे भगवान विष्णूचं दुसरं नाव मानल जातं.