रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो

Team Lokshahi

अखेर आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt Ranbir Kapoor)लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रत्येकजण त्यांच लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहे. १३ एप्रिलला रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी फक्त जवळचे कुटुंब सदस्य आणि मित्र उपस्थित होते. नीतू कपूर तिची मुलगी रिद्धिमा कपूर आलिया आणि रणबीरच्या मेहंदीसाठी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

नीतू कपूरच्या मेहंदीच्या डिझाइनची सध्या सर्वाधिक चर्चा झाली आहे. कारण इतकं खास आहे की नीतू कपूरच्या मेहंदीची चर्चा आहे. तुम्ही नीतू कपूरचे मेहंदी डिझाइन पाहू शकता. नीतूने तिच्या मेहंदीमध्ये ऋषी कपूरचे नाव लिहीले आहे.

रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या हातावरच्या मेहंदी डिझाईन्सचा फोटो शेअर केला.

करिश्मा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या पायावर मेहंदीच्या डिझाईन्सचा फोटो शेअर केला. करिश्माने मेहंदी फंक्शनसाठी केशरी रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. करिश्मा खूपच सुंदर दिसत होती.

आलिया आणि रणबीरच्या मेहंदीसाठी करिश्मा आणि करीना एकत्र आल्या होत्या. करिना पांढऱ्या रंगाच्या लेहेंगामध्ये होती. करीना या पांढऱ्या रंगाच्या लेहेंगामध्ये सुंदर दिसत होती.

आलिया आणि रणबीरच्या मेहंदीसाठी करण जोहरही सहभागी झाला होता.

महेश भट्ट पूजा भट्टसोबत पोहोचले. पूजा जेव्हा फंक्शन हॉलमधून बाहेर आली तेव्हा तिच्या हातातही मेहंदी होती.