shweta walge
बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) 34 वर्षांची झाली आहे. तीचा जन्म 6 जून 1988 रोजी ऋषिकेश, उत्तराखंड येथे झाला.
खूप कमी लोकांना माहित आहे की नेहाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एक काळ असा होता जेव्हा तीचे वडील समोसे विकायचे. एवढेच नाही तर गरिबीमुळे नेहा लहानपणी बहीण आणि भावासोबत जगरात्यात गाणे म्हणायची.
तिच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना नेहा कक्करने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते – मी लहान असताना आमच्या कुटुंबाची परिस्थिती ठीक नव्हती. दीदी सोनू ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत पापा समोसे विकायचे.
नेहा कक्करने सांगितले होते की - वडिलांना मेहनत करताना पाहून दोन्ही भाऊ-बहिणींनी जागरात्यात गाणे सुरू केले, त्यानंतर मीही त्याचा एक भाग बनले. संध्याकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत आम्ही गाणे म्हणायचो. जागरतींमधून मी गाणे सुरू केले तेव्हा मी 4 वर्षांची होते.
नेहा कक्करचा भाऊ टोनीने (Tony) एकदा सांगितले होते की, आई-वडील नेहाला जन्म देऊ इच्छित नव्हते, याचे कारण आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण गर्भधारणेचे आठ आठवडे उलटून गेल्यामुळे आईचा गर्भपात (Abortion) होऊ शकला नाही आणि अशा प्रकारे ६ जून १९८८ रोजी आजच्या प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा जन्म झाला.
नेहा कक्करने टीव्हीवरील सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलच्या (Indian Idol) दुसऱ्या सीझनमध्ये भाग घेतला होता. मात्र, ती अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वीच बाहेर पडली. यानंतर 2008 मध्ये त्यांचा म्युझिक अल्बम (Album) रिलीज झाला.
नेहाने तिच्या करिअरमध्ये अनेक गाण्यांना आवाज दिला. तीची गाणी इंटरनेटवर सर्वाधिक लोकप्रिय आहेत. नेहाला तिच्या 'सेकंड हँड' जवानी या गाण्याने बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. हे गाणे त्यांचे पहिले हिट गाणे मानले जाते.
चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच ती तिच्या म्युझिक अल्बमसाठीही (Music album) ओळखली जाते. काला चष्मा, मनाली ट्रान्स, आंख मारे, कर गई चुल, समर, साकी साकी इत्यादी त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांचा समावेश आहे.
नेहा कक्करने लॉकडाऊन दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये तिचा प्रियकर रोहनप्रीत सिंगसोबत (Rohanpreet Singh) लग्न केले होते. दिल्लीतील गुरुद्वारामध्ये दोघांचे लग्न झाले आणि चंदिगडमध्ये रिसेप्शन पार पडले.