Shweta Shigvan-Kavankar
Neck Skin Tips : कडक ऊन आणि जास्त घाम यांमुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा मानेची त्वचा काळी पडू लागते. ही समस्या वेळीच सोडवण्याची गरज आहे. कारण सुंदर चेहरा असूनही काळ्या मानेमुळे सौंदर्य नाहीसे होते.
काही वेळा हायपरपिग्मेंटेशनमुळेही ही समस्या उद्भवू शकते. हार्मोनल बदल देखील याचे कारण असू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला पिगमेंटेशन होईल आणि यासाठी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.
बेसन आणि लिंबू
एक चमचा बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. नंतर मानेवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. यानंतर हलक्या हातांनी मसाज करून स्वच्छ करा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.
लिंबू आणि गुलाब पाणी
लिंबाचा रस मानेवर लावल्याने मानेचा काळेपणा कमी होतो. यासाठी एक लिंबू चांगले पिळून त्याचा रस काढा, त्यानंतर त्यात गुलाबजल टाका. आता मानेवर लावा आणि रात्रभर राहू द्या आणि सकाळी पाण्याने धुवा.
कच्चे दुध
त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्चे दूध खूप उपयुक्त आहे. यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या आणि त्यात कापूस टाका आणि 20 मिनिटे ठेवा. नंतर पाण्याने धुवा.
काकडी आणि गुलाब पाणी
सर्वप्रथम काकडी बारीक चिरून त्यात गुलाबजल टाकून पेस्ट बनवा. यानंतर पेस्ट लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.
बटाट्याचा रस
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन-सी असते जे त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवण्यास मदत करते. यासाठी प्रथम बटाटा किसून त्याचा रस काढून मानेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.
कोरफड
कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि काही एन्झाईम्स असतात, जे त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्याचे काम करतात. मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी प्रथम कोरफडीच्या पानाचा गर काढून मानेला हलक्या हातांनी १० मिनिटे मसाज करा. नंतर पाण्याने धुवा.