शुभेच्छा देत मराठी कलाकारांनी केला 'मदर्स डे' साजरा

shamal ghanekar

खरंतर आईवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? जगभरात 'मदर्स डे' आज उत्सहात साजरा केला जात आहे. आईवरचे प्रेम साजरे करण्याचा हा दिवस. आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी महत्वाचे असते. अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीमधून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. या महिन्यामध्ये (8मेला) 'मदर्स डे' (Mother's Day) रविवारी साजरा केला जातो आहे. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी आपल्या आईसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. आणि हा दिवस आणखी खास आणि सुंदर बनविला आहे.

स्वीटू म्हणजेचं अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिने तिच्या सोशल मिडियावर तिच्या आईसोबतचा क्यूट स्माईलचा फोटो शेअर करत मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोमध्ये त्या दोघींचे गोड हास्य पाहायला मिळत आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी म्हणजे गिरिजा प्रभुनेही (Girija Prabhu) तिच्या आईबरोबरचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

Girija Prabhu

अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar) आईसोबत एक सुंदर फोटो शेअर मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Shashank Ketkar

चंद्रामुखीमधील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरनेही (Amruta Khanvilkar) सोशल मिडियावर आईसोबतचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar