shamal ghanekar
2014 पासून भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज (17 सप्टेंबर) 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशा-परदेशात प्रचंड चाहतावर्ग आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा जन्म (17 सप्टेंबर 1950 )मध्ये गुजरातच्या वडनागर येथे झाला आहे. देशभर मोदींच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू आहे.
पंतप्रधान मोदी हे फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात.
याआधी 2020 मध्ये पंतप्रधान मोदी हे लोकप्रिय नेते ठरले होते. तेव्हा मोदींना 84 टक्के मते मिळाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तमिळनाडू भाजपकडून जन्मलेल्या बालकांना दोन ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस खास बनवण्यासाठी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केली आहेत.
तर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या संपत्तीमध्ये २०२१-२२ वर्षात २६.१३ लाखांची वाढ झाली आहे.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.