shamal ghanekar
भारतीय महिला क्रिकेटची दिग्गज मिताली राजने (Mithali Raj) सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी अचानक त्यांनी सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.
39 वर्षीय क्रिकेटपटूने कसोटी, एकदिवसीय, टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
2017 महिला क्रिकेट विश्व चषकादर्मयान मितालीने सलग सात अर्धशतक लगावले आहेत. तर अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
मिताली विश्वचषक स्पर्धेत 1,000हून अधिक धावा केल्या आहेत. 1,000हून अधिक धावा करणारी मिताली ही पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटर आहे.
मिताली आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 2,000 धावा करणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.
टेस्ट सामन्यामध्ये दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर आहे. 2002 साली तिने इंग्लंड विरुद्ध 214 धावांची खेळी खेळली होती.
मितालीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.या चित्रपटामध्ये तापसी पनू तिची मुख्य भूमिका साकारणार आहे.