Siddhi Naringrekar
घरगुती सिलेंडरवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते याची बहुतांश लोकांना काहीच कल्पना नसते.
आपण सिलेंडर घेताना त्यामधील गॅस लीक होत नाही ना, याची तापासणी करतो.
सध्या देशात बहुतांश लोकांच्या घरी घरगुती गॅस कनेक्शन आली आहेत.
एलपीजी सिलेंडरवर ज्या तीन पट्ट्या असतात, त्यावर ठळक अक्षरामध्ये एक कोड लिहिलेला असतो. हा कोड म्हणजेच सिलेंडरची एक्स्पायरी डेट.
हा कोड A-24, B-25, C-26 आणि D-27 असा असतो. या कोडमधील ABCD ही इंग्रजी अक्षरे महिना दर्शवतात, तर त्यामागील लिहिलेला क्रमांक कोणतं वर्ष आहे,
या कोडमध्येच टेस्टिंग डेट दिलेली असते. यालाच Test Due Date असंही म्हणतात.
ABCD या इंग्रजी अक्षरांना तीन-तीन महिन्यांच्या गटात विभागणी केली जाते.
A अक्षराचा अर्थ- जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, B अक्षराचा अर्थ - एप्रिल, मे आणि जून , C अक्षराचा अर्थ - जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर , D अक्षराचा अर्थ - ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर इत्यादी.