Vikrant Shinde
बॉलिवूडमधील बहूचर्चित जोडपं अर्थात आलिया भट्ट व रणबीर कपूर. हे जोडपं येत्या 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे.
हे जोडपं जरी बहूचर्चित असलं तरीही त्यांची प्रेमकहाणी (Love Story) फारश्या लोकांना ठाऊक नाही.
आलियाला रणबीर अगदी लहानपणापासून आवडायचा अशी कबूली आलियाने बऱ्याचदा दिली आहे. मात्र त्यांची पहिली भेट ही संजय लीला भन्साळी 'बालिका वधू' चित्रपटाच्या संदर्भात झाली होती. हा चित्रपट आजतागायत आला नसला तरी आलिया-रणबीरच्या प्रेमाची गाडी मात्र पुढे सरकली.
रणबीरसोबत काम करण्याची आलियाची इच्छा 2017 मध्ये पूर्ण झाली. 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगच्या निमित्ताने त्या दोघांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. ह्याच निमित्ताने त्यांचं प्रेम पुन्हा बहरून आलं.
आलिया आणि रणबीरची प्रेमकहाणी (Lovestory) खऱ्या अर्थाने अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) रिसेप्शनमध्येसर्वांच्या समोरआली. या कार्यक्रमासाठी आलिया आणि रणबीर हातात हात घालून एंट्री करताना दिसले. हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात आलिया आणि क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये रणबीरवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.