'आदिपुरुष' वादावर कृती सेननने सोडले मौन; म्हणाली, मी फक्त...

Shweta Shigvan-Kavankar

'आदिपुरुष' चित्रपट 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला.

विशेषत: चित्रपटातील संवाद आणि पात्रांच्या लूकवर तर सतत वाद सुरूच आहे.

आता या चित्रपटात 'सीते'ची भूमिका साकारणाऱ्या क्रिती सेननने या वादावर भाष्य केले आहे.

क्रितीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून या वादावर आपली बाजू मांडली आहे.

व्हिडीओमध्ये रावण वध, सीता आणि रावण संवाद, हनुमान संजीवनी बूटी, जय सिया राम गीत इत्यादींचा समावेश आहे.

त्यात लोकांच्या टाळ्या आणि 'जय श्री राम'चा गजर होताना दिसत आहे.

यासोबत क्रितीने लिहिले की, चिअर आणि क्लॅपवर फोकस करत आहे. चित्रपटाच्या वादावर नाही.

'आदिपुरुष' चित्रपटात प्रभासने 'श्री राम' आणि कृती सेननने 'सीता माँ'ची भूमिका साकारली होती.

क्रिती सेनन शाहिद कपूरसोबत लवकरच नवीन चित्रपटात दिसणार आहे.