Siddhi Naringrekar
आब्यांचा सिझन सुरु झाला आहे. आंबा हा फळांचा राजा. त्यात कोकणातील हापूस आंबा म्हणजे काही वेगळीच बात.
कोकणातील हापूस आब्यांची चव म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध.
कोकणातील हापूस आंब्याला आता परदेशातून मागणी वाढली आहे.
कोकणात देवगड आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे.
कोकणातील हापूस आता साता समुद्रापार पोहोचला आहे.
याचा मोठा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे.
वातावरणातील बदलामुळे आंबा पीकावर याचा परिणाम होतो. याच्यामुळे आंब्याचे पीकही कमी येते.
महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड जाली आहे. तर 3.31 लाख मेट्रीक टन आंबा फळांचे उत्पादन झाले आहे.
कोकणात हापूसचा हंगाम जोरदार सुरु झाला आहे. बाहेरगावी देखिल त्यांची मागणी वाढली आहे.