रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये करीना-सैफचा रॉयल जलवा

Shweta Shigvan-Kavankar

प्रतिष्ठित रेड सी फिल्म फेस्टीव्हल सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे सुरू झाला असून यात बॉलीवूडच्या रॉयल जोडीनेही हजेरी लावली आहे.

करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.

यासाठी बेबोने साडीची निवड केली असून फुल स्लीव्हज ब्लाउजसोबत शीअर सिक्विन साडी नेसली होती.

बन आणि क्लासिक गोल्ड सब्यसाची क्लचसह करिना खूपच सुंदर दिसत होती.

स्मोकी आयमेकअपसह लांब झुमक्यांनी करीनाने आपला लूक पूर्ण केला होता.

तर, सैफने त्याच्या शार्प टक्स आणि फॉर्मल शूजची जोडी परिधान केली आहे.

याशिवाय करीना कपूरने टील ब्लू मोनिक लुइलीयर गाउनही परिधान केला होता.

यासह तिने पोनीटेल आणि सिग्नेचर ग्लॅम लुकमध्ये ठेवला होता.

लोकप्रिय स्टार करीना आता निर्माती म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित एका चित्रपटात करीना चित्रपटाची सह-निर्मिती करत आहेत.