Siddhi Naringrekar
जान्हवी कपूरने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
जान्हवी सतत सोशल मिडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जान्हवीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले नसेल, परंतु सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत ती सामील झाली आहे.
साडीतल्या जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.
या साडीसोबत डीप नेक बॅकलेस ब्लाउज घातला आहे. जान्हवी नुकतीच 'गुड लक जेरी'मध्ये दिसली होती.
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला.