shamal ghanekar
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या तिच्या अगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जॅकलिन फर्नांडिस नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर (Social Media) शेअर करत असते. नुकताच जॅकलिनने लेटेस्ट फोटोशूट केले आहे आणि त्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चेत होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये जॅकलिनचा एथनिक लूक (Look Ethnic) पाहायला मिळत आहे. जॅकलीन एथनिक लूक प्रेक्षकांनाही खूप आवडला आहे.
या फोटोमध्ये जॅकलिनने डिझायनर प्रिंटेड साडी परिधान केली आहे. जॅकलीनने हेवी मेकअप आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.
या फोटोंना काही तासांत लाखो लाईक्स आणि जोरदार कमेंट केल्या आहेत.
जॅकलिन दुबईमध्ये आयोजित IIFA 2022 अवॉर्ड्स सोहळ्यामध्येही उपस्थित होती.यावेळी जॅकलिनचे काही घायाळ करणारे फोटो पाहायला मिळाले.
जॅकलीनने यावेळी फाल्गुनी शेन पीकॉक (Shane Peacock) या ब्रँडची साडी परिधान केली होती.