Team Lokshahi
पहिली स्पोर्टस अँकर आणि अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्या कामा सोबतच तिच्या स्टायलिश लूक साठी प्रसिध्द आहे
मंदिरा बेदीचा जन्म 1972 मध्ये कोलकत्ता येथे झाला. 1994 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तिने सुरुवातीचे काही काळ टीव्ही अॅकर म्हणून काम केले.
स्पोर्टस अँकरिंग करणारी मंदिरा पहिली महिला स्पोर्टस अॅकर ठरली. मंदिराने आयसीसी वर्डकपमध्येही चांगल्या प्रकारे काम केले. तिच्या अॅकरिंगचे कौतुक झाले पण कौतुकासोबतच तिला ट्रोलही केलं गेलं.
2007 च्या वर्ल्डकपदरम्यान तिच्यावर टीका करण्यात आली कारण वर्ल्डकपदरम्यान तिने नेसलेल्या साडीवर सगळ्याच क्रिकेट टीमचे झेंडे होते. त्यानंतर तिने माफीही मागितली होती.
मंदिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. सोबतच ती तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.
मंदिराने औरत, क्यूकी सास भी कभी बहू थी, इंडियन आयडल ,फेम गुरुकुल ,डील और नो डील, या सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
मंदिराने 2020 मध्ये तिची मुलगी ताराला दत्तक घेतलं. त्यावेळी तिच्या निर्णयाचं कौतुक केल गेल.