प्रख्यातः बॉलीवूड अभिनेत्री 'माला सिन्हा' यांना ८५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Team Lokshahi

माला यांचे खरे नाव 'अल्दा सिन्हा' आहे त्यांना सिनेश्रुष्टीत 'माला सिन्हा' या नावाने ओळखले जाते.

1952–1994 साला पर्यंत त्या चित्रपट श्रुष्टीत कार्यरत होत्या.

त्यांनी प्रामुख्याने हिंदी, बंगाली आणि नेपाळी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनयासोबतच त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी गायीकी करून प्रेक्षकांची मने जिंकली.

माला यांनी प्रादेशिक सिनेमांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली , त्या 1950 च्या उत्तरार्धात, 1960 आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या.

माला यांना त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी पुरस्कृत करण्यात आले व, नामांकन ही प्राप्त झाले.

कबिता, बोल मेरे साथिया, ललकार, चुपके से दिल देदे, मर्यादा, मेरे मेहबूब, एक तू ना मिला ही काही माला यांची त्या काळातील प्रसिध्द गाणी होती. माला यांच्या अभिनयाच्या जादूने त्यांची प्रेक्षकांच्या मनावर छाप कोरली गेली.

सशक्त स्त्रीकेंद्रित निबंधासाठी त्यांना "धडपड दिवा" आणि "महिला सिनेमाची मशाल वाहक" म्हणून ओळखले जात असे. त्याचबरोबर त्यांना 2018 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.