‘सीता रामम्’मधील मृणालचा सिंपल लूक चाहत्यांना भावला

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असलेला ‘सीता रामम्’ हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

या चित्रपटात सीताच्या भूमिकेत मृणाल ठाकूर झळकली आहे. सीताच्या भूमिकेत मृणाल अतिशय सिंपल लूकमध्ये दिसत आहे.

तिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच भावला असून सीताच्या भूमिकेतील मृणालचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तिने 'मुझे कुछ कहते है खामोशियां'मध्ये काम केले होते. तर, कुमकुम भाग्य या टीव्ही मालिकेत बुलबुल अरोराची भूमिका साकारली असून या सिरिअलमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली होती.

मृणालने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2018 मध्ये 'लव्ह सोनिया' या सिनेमातून केली होती. परंतु, तिच्या करिअरला वळण ऋतिक रोशनच्या सुपर 30 चित्रपटाद्वारे मिळाले.

यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. नुकतीच ती शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटातही दिसली होती

तर, हिंदीसोबत मृणालने मराठी चित्रपटामध्येही काम केले होते. आता 'सीता रामम्’ या चित्रपटातूनच तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

मृणाल लवकरच उमेश शुक्ला दिग्दर्शित 'आंख मिचोली' नावाच्या कौटुंबिक विनोदी चित्रपटात दिसणार आहे.