shamal ghanekar
किवी या फळाचे सेवन कमी लोक करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? किवी फळ खाण्याचे फायदे काय आहेत. तर चला जाणून घेऊया.
किवी फळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
किवी फळाचे सेवन केल्याने आपल्या त्वचेला आणि आपली हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्या जाणवत असतात त्यांनी दिवसातून दोन वेळा किवी फळाचे सेवन करू शकता. त्यामुळे बीपी नियंत्रणात येईल.
किवी फळामध्ये खूप जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांचा समावेश आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किवी फळाचे सेवन केले जाते
ज्या लोकांना पोटाच्या समस्या जाणवत असतील त्यांनी नियमितपणे किवी फळाचे सेवन करू शकता.
काही लोकांना मानसिक तणाव जाणवत असतो असे लोक तणाव कमी करण्यासाठी किवी फळाचे सेवन करू शकतात.