Team Lokshahi
'हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, 'धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांच्या गजरामध्ये सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला.
फुलांनी सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने स्वागत केले.
दुपारी बारा वाजता पालखी सोहळ्याचे सिंहगडावर आगमन झाले आणि गडाचे प्रवेशद्वार आणि बुरुज फुलांनी सजवण्यात आले होते. तर, ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
पालखी सोहळ्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्तमंत्री दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांतमंत्री संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण उपस्थित होते.
सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली.