shweta walge
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2022) आपले सौंदर्य दाखवण्यात हिना खान (Hina Khan) बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये मागे नाही. तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिना तिच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसत आहे.
हिना खान छोट्या पडद्यावरील एक अशी अभिनेत्री आहे जी आपल्या सौदर्याने बॉलिवूड अभिनेत्रीना जबरदस्त टक्कर देते. तिची स्टाइल आणि चार्म कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा कमी नाही.
अलीकडेच या कार्यक्रमातून तिचा नवा लूक (new look) समोर आला आहे. या फोटोंमध्ये हिना सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये हिना गोल्डन ऑफ शोल्डर (Golden off shoulder) बॉडी फिटेड ड्रेसमध्ये दिसत आहे.
एकूण लूकबद्दल सांगायचे तर, हिनाने थाई हाय स्लिट गोल्डन ऑफ शोल्डर गाउनमध्ये बनच्या स्वरूपात केस बांधले आहेत. यासोबतच मरून लिपस्टिक तिचा लुक पूर्ण करत आहे.
हिना खानने 19 मे रोजी 75 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर चालली होती. हिनाने रेड कार्पेटवर ऑफ शोल्डर पेप्लम व्हॉल्युमिनस फेदर गाऊन घातला होता. अभिनेत्रीने तिचा लुक सिल्व्हर पेन्सिल हिल्स आणि डायमंड कानातले आणि ब्रेसलेटसह पूर्ण केला.
कान्सच्या दुसऱ्या दिवशी हिनाने लाल रंगाचा लांब स्ट्रॅपलेस ड्रेस निवडला. जिचा pleated स्कर्ट आणि फिगर हगिंग डिझाइन तिच्या वक्र आणि सडपातळ आकृती flaunting होते. तर लहान केसांना साईड पार्टेड लुक देण्यात आला होता. जे त्याला फक्त सुंदर बनवत होते.