KK : सिंगर केकेच्या शेवटच्या परफॉर्मन्सचे काही खास फोटोज्

shamal ghanekar

केकेचा (KK) जन्म 23 ऑगस्ट 1968 मध्ये दिल्ली (Delhi ) येथे झाला होता. केके यांनी 6 महिने सेलसमनची नोकरी केली होती.

KK

ही नोकरी करण्यामागे एक कारण होते. ते कारण म्हणजे बालपणीचे प्रेम. त्यांनी ज्योतीसोबत (Jyoti) लग्न करण्यासाठी नोकरी करत असल्याचे कपिल शर्मा शोच्या माध्यमातून सांगितले होते.

KK

तसेच त्यांनी वडील आणि पत्नीच्या साहाय्याने गायनाची आवड जोपासली होती. त्यांनी 200 हून अधिक सुपर हिट (Super Hit) गाणी गायली आहे. तू आशिकी है, लबों को, अशी अनेक गाणी गायली आहेत.

KK

प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्ण कुमार कुन्नथ यांचा कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्ट (Live Concer) दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

KK

केके यांचा कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजम येथे हा कार्यक्रम होता.

KK

प्रसिद्ध गायक केके यांची वयाच्या 53 व्या वर्षी प्राणज्योत माळवली. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

KK