shweta walge
दीपिका पदुकोणची पार्श्वभूमी नॉन फिल्मी आहे. तीचे वडील प्रकाश पदुकोण बॅडमिंटनपटू आहेत. दीपिका पदुकोणने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ सिनेमातून केली आणि त्यानंतर बॉलिवूडवर वर्चस्व गाजवले.
प्रियांका चोप्राचे आई-वडील आर्मीत डॉक्टर आहेत. त्यांनी फिल्मी दुनियेत खूप काम करून नाव कमावले आहे. प्रियांका चोप्राने साऊथ इंडस्ट्रीमधून अभिनयाला सुरुवात केली आणि तिने बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहेत.
अनुष्का शर्माचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. नॉन फिल्मी बैकग्राउंडमधून आलेल्या अनुष्का शर्माने इंडस्ट्रीत विशेष ठसा उमटवला आहे. त्याने 2008 मध्ये 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.
क्रिती सॅनन मूळची दिल्लीची असून तिची पार्श्वभूमी नॉन फिल्मी आहे. क्रिती सेननने बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वत:च्या बळावर चांगले स्थान मिळवले आहे. साऊथच्या चित्रपटांतून तीने अभिनयाला सुरुवात केली.
कंगना रणौत हिमाचल प्रदेशची असून तिने 2006 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगना राणौतचा पहिला चित्रपट 'गँगस्टर' होता. यानंतर तीने अनेक चित्रपटांमध्ये काम करून यशाचा झेंडा रोवला आहे.
तापसी पन्नूचा जन्म दिल्लीत झाला आणि अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तापसी पन्नूने साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत काम केले आहे.