Shweta Shigvan-Kavankar
बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांना नोव्हेंबरमध्ये कन्यारत्न प्राप्त झाले होते.
या नन्ही परीचे नाव त्यांनी देवी ठेवले असून तिची झलक अद्याप दाखवली नव्हती.
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या देवीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर या जोडप्याने आपल्या लाडक्या देवीचा चेहरा दाखवला आहे.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, नमस्कार, मी देवी आहे.
या फोटोंमध्ये देवी बासू सिंग ग्रोव्हर बेबी पिंक ड्रेसमध्ये अतिशय क्यूट दिसत आहे. यावर 'डॅडीज प्रिन्सेस' लिहिलेले आहे.
बिपाशाने मॅचिंग हेअरबँडने तिचा लूक पूर्ण केला आहे.
बिपाशा-करणच्या मुलीवर सेलेब्स आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
एका चाहत्याने लिहिले की, ती खूप गोड देवदूत आहे. तर दुसऱ्याने खूप गोंडस, असे लिहीले आहे.
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले होते. या जोडप्याने 30 एप्रिल 2016 रोजी मुंबईत लग्न केले.
लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर एका लाडक्या मुलीचे पालक झाले.