सुब्रमण्यम स्वामी माऊलींच्या वारी सोहळ्यात सहभागी; वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगांच्या तालावर धरला ठेका

Siddhi Naringrekar

माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी सासवडमध्ये माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं.

Admin

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे वारी सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला.

Admin

यावेळी त्यांच्या समवेत पुरंदरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतरे हे देखील उपस्थित होते.

Admin

तिथे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळेही उपस्थित होत्या.

Admin

एका दिंडीमध्ये सहभाग घेत टाळ मृदंगाच्या तालावर त्यांनी ठेका धरला.

Admin

ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी विसावा आहे. त्या विसाव्या स्थळाला भेट दिली.

Admin

यानंतर त्यांनी पालखीतळावर जाऊन माऊलींच्या पालखीचं दर्शनही घेतलं. गळ्यामध्ये टाळ घालून त्यांनी टाळ, मृदंगाच्या तालावर ठेकाही धरला.

Admin