बॉलीवूडमधल्या 'या' यंग कपलचं तीन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर झालं ब्रेकअप

left

खाली पीली या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
अनन्या आणि इशानला अनेकदा पार्ट्यांमध्ये, कॅफेमध्ये एकत्र पाहिलं गेलं. नुकत्याच पार पडलेल्या शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती.
अनन्या आणि इशान हे मालदीवलाही एकत्र गेले होते.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात व्हॉट्स अॅप चॅटमध्ये अनन्याचं नाव समोर आलं आणि एनसीबीने तिला चौकशीसाठी बोलावलं, तेव्हा इशानने तिची साथ दिली.
मात्र आता जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.या ब्रेकअप मागचं कारण अद्याप समोर आले नाही आहे. तसेच या ब्रेकअपबद्दल अद्याप या दोघांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही.