Shweta Shigvan-Kavankar
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरेंनी पाहणी केली.
यानंतर मुंबईकडे जेजुरी मार्गे जाताना पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात खंडेरायाचे दर्शन घेतले.
आदित्य ठाकरे यांनी जेजुरी गडावर कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी केले.
तर, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत त्यांनी भंडारा देखील उधळला.
तसेच, जेजुरी गडावरील 42 किलोची खंडा तलवार देखील आदित्य ठाकरे यांनी उचलली.
त्यांचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळत देवाकडे सर्वांसाठी सदिच्छा मागितली असल्याचे सांगितले.
श्री खंडोबाचे आज दर्शन घेऊन भंडारा-खोबरं उधळलं. मार्तंड मल्हारीची ही सोन्याची जेजुरी महाराष्ट्राच्या पाठीशी सदैव उभी आहे. देवस्थानी उधळलेला भंडारा लोककल्याणासाठी सर्वदूर पसरू दे, इडा पीडा टळू दे आणि राज्याचं भलं होऊ दे, असे त्यांनी म्हंटले आहे.