Rajshree Shilare
आरसीबीचा(RCB) माजी कर्णधार विराट कोहली(Virat Kholi) गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर दुष्मंथा चमीराचा 'विमान'(Aeroplane) लखनऊचा गोलंदाज दुष्मंथा चमिरा (Dushmantha Chamira)दोन्ही हात पसरून मैदानावर दिसला.
युझवेंद्र चहलची(Yuzvendra Chahal) 'शहेनशाह स्टाईल'. वर्ल्ड कप-2019 (world cup 2019)दरम्यान, युझवेंद्र चहलची एक स्टाइल सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली, ज्यावर जोरदार मीम्स बनवले गेले. IPL-2022 मध्ये हॅट्ट्रिक घेतल्यानंतर चहल त्याच पद्धतीने मैदानावर दिसला.
राजस्थान रॉयल्सचा ओबेद मॅकॉय(Obed Mccoy) हा परदेशी खेळाडू असला तरी आजकाल त्याला देशी चित्रपटांच्या भुताने पछाडले आहे. केकेआरविरुद्धच्या पहिल्या विकेटनंतर तो अल्लू अर्जुनच्या(Allu Arjun) पुष्पा या 'मैं झुकेगा नहीं... ' स्टाईल करताना दिसला.
आवेश खान हाताने 'V' व्ही चिन्ह बनवले. मुंबई इंडियन्सविरुद्ध तिसरी विकेट घेतल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या आवेश खानने(Avesh khan) दोन्ही हात वर करून विजयाची निशाणी केली.
के एल राहुलने (K.L.Rahul)दोन्ही कान धरले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याचे दोन्ही कान धरलेले दिसले. यापूर्वीही त्याने अनेकवेळा असे केले आहे.
शाहरुख खान(shah rukh khan) बनला मोहम्मद सिराज(Mohammed Siraj) . दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ ला( Prithvi Shaw)बाद केल्यानंतर आरसीबीचे दोन्ही वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये दिसले.