Team Lokshahi
विराट हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कॅप्टन पदी खेळतो.
विराट भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे.
कोहलीने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले, तो 2013 मध्ये प्रथमच एकदिवसीय फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला, त्याने दोनदा आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी-२० (२०१४ आणि २०१६ मध्ये) मॅन ऑफ द टूर्नामेंट जिंकले आहे.
कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत- विशेष म्हणजे सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी (आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द डिकेड): 2011–2020; 2017 आणि 2018 मध्ये सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी (आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर); ICC कसोटी खेळाडू (2018); ICC ODI प्लेयर ऑफ द इयर (2012, 2017, 2018) आणि विस्डेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड (2016, 2017 आणि 2018), राष्ट्रीय स्तरावर, त्याला 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2017 मध्ये क्रीडा प्रकारांतर्गत पद्मश्री आणि 2018 मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने विराटला सन्मानित करण्यात आले.
विराट कोहली ला भारतात त्याचे चाहते 'किंग कोहली' , 'GOAT' म्हणजेच (Greatest of all time) या नावाने ओळखतात, त्याचबरोबर विराटला 'CHIKOO' अशाही टोपण नावाने ओळखले जाते, विराटने सांगितले कि, आमच्याकडे भारतात चंपक नावाचे कॉमिक आहे. त्या कॉमिकमध्ये एक ससा होता आणि त्या पात्राचे नाव चिकू. तर, प्रशिक्षक मला चिकू म्हणत, कारण माझे कान मोठे होते आणि तेथूनच हे टोपणनाव पडले ”
'Wrogn' नावाचा एक ब्रांड विराट कोहलीने सह-निर्मित केला, आणि 2014 मध्ये Universal Sportsbiz (USPL) ने त्याची स्थापना केली. त्याचबरोबर 'One8' या ब्रांड ची स्थापना केली , जी कोहलीच्या जर्सी क्रमांक 18 चे प्रतिनिधित्व करते.
विराट कोहली आणि इंडिअन बॉलीवूड अभिनेत्री 'अनुष्का शर्मा' यांनी 2017 मध्ये 11 डिसेंबरला Borgo Finocchieto 'इटली' मध्ये लग्नगाठ बांधली . आणि त्यांना 'वामिका' नावाचे एक सुंदर कन्यारन्त प्राप्त झाले.
विराटला T-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ओळखले जाते. विराट आपल्या भन्नाट फोटोशूट्स मुळे नेहमीच सोशल मिडीयावर चमकत असतो.